बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुशांत सिंह बद्दलची भावना भाजप नेत्यांना अन्वय नाईक यांच्याबद्दल का वाटत नाही?”

मुंबई | अर्णब गोस्वामींना अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यानंतर भाजप सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सचिन सावंत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सचिन सावंत यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. सुशांत सिंहबद्दलची भावना भाजप नेत्यांना दिवंगत अन्वय नाईक यांच्या बद्दल का वाटत नाही?, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या भाजप नेते इतके विरोधात का? महाराष्ट्रातील मायलेकींना न्याय मिळाला याचं किरीट सोमय्या, राम कदम यांना दुःख झालं. महाराष्ट्राची 13 कोटी जनता माफ करणार नाही, असं सचिन सावंत यांनी किरीट सोमय्या आणि राम कदम यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

दरम्यान, आमदार राम कदम हे अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी मंत्रालय परिसरात उपोषणास बसले होते. तसेच अर्णब यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचंही कदम यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“शाहू महाराजांनी 200 वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, आज मराठा समाजाला का नाही?”

गौरी गडाख यांचा शवविच्छेदन अहवाल आला समोर

‘शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा मालमत्ता कर माफ करणार’; उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

कंगणा राणावतने जो बायडन यांना दिली गजनीची उपमा, म्हणाली…

दिवाळीनंतरचे 15 दिवस अत्यंत कसोटीचे असणार- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More