बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना NIA ने ठोकल्या बेड्या

मुंबई | तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी 19 मार्चला सुनावणी होणार होती.

शनिवार सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत वाझेंची चौकशी सुरू होती. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. वाझेंचा अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी करण्यात सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.

महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. यानंतर सचिन वाझेंनी ATS ने दहा तास चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेतलं होतं. जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्याचे आदेश निघाले होते.

थो़डक्यात बातम्या- 

मला कडक लॉकडाऊन लावण्यास भाग पडू नका- उद्धव ठाकरे

धक्कादायक! राज्यात कोरोनाचा वाढता आलेख, जाणून घ्या आजची आकडेवारी

शेर की झलक सबसे अलग! युवी पाजी तुस्सी ग्रेट हो, 4 चेंडूत 4 सिक्सर, पाहा व्हिडीओ

“केवळ भाजप असा पक्ष आहे जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो”

गाण्यावर जखमी जेनेलिया, रितेश देशमूख आणि मित्रांनी केला अफलातून ‘डान्स’, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More