बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसुख हिरेनच्या पोस्टमार्टमपूर्वी सचिन वाझेंनी घेतली होती डाॅक्टरांची भेट; NIA च्या हाती लागली ‘ही’ माहिती

मुंबई | मनसुख हिरेन प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा एनआयएद्वारे होणार आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या रूग्णालयात ठेवण्यात आला होता, त्या रात्री एनआयएच्या ताब्यात असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे शवविच्छेदन होण्याआधी संबंधित डॉक्टरांना जाऊन भेटले होते, अशी माहिती समोर आली आहे.

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात मनसुख हिरेन यांचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. सचिन वाझे शवविच्छेदनाच्या आधल्या रात्री तिथे काय करत होते ? याचा तपास एनआयए करत आहे. मनसुख हिरेन यांच्या पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांची भेट वाझेंनी का घेतली होती? हा सवाल उपस्थित होत आहे. हिरेन यांच्या पार्थिवावर ठाण्याच्या जवाहरबाग स्मशानभूमीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनाही वाझेंनी आपली ओळख दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सचिन वाझे तिथे का गेले होते?, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेत ‘मी सचिन वाझे’ अशी ओळख का करून दिली होती? यावर आता एनआयए तपास करत आहे.

दरम्यान, अँटालिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. वाझेंच्या कोठीडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाझे यांना आणखी आठवडाभर तरी एनआयएच्या ताब्यात राहावं लागणार आहे. कारण, सचिन वाझेंना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून 30 जिवंत काडतुसे देण्यात आली होती. त्यासोबत त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती. तेव्हा 30 पैकी 5 बुलेट्स वाझेंकडे आहेत. मात्र बाकी 25 काडतुसे गायब आहेत. ही 25 काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नाही, असं एनआयएने दोन दिवसांपूर्वी न्यायालयात सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या

आलिया भट्टच्या आईचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाल्या…

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टांगती तलवार; फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीची शक्यता

‘नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का?’; मनसे आमदार राजू पाटील यांचा संतप्त सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आले, तरी…- चंद्रकांत पाटील

महावितरणाच्या अधिकाऱ्याला चप्पलीचा हार घालून खुर्चीला बांधलं; भाजप आमदाराचा कारनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More