बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीये’; सचिन वाझेंच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसने खळबळ

मुंबई | पोलिस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांची एटीएसकडून 10 तास चौकशी झाली होती. उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या जवळ स्फोटक सापडली होती. त्यानंतर या प्रकरणाचा मुख्य साक्षीदार मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मुत्यू झाला. या प्रकरणावरून वाझेंवर विरोधकांनी अनेक गंभीर आरोप केले. अशात आज त्यांनी त्यांच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसला एक पोस्ट लिहिली आहे. त्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

3 मार्च 2004 साली सीआयडीने मला एका खोट्या प्रकरणात अटक केली होती. मला केलेली ही अटक आतापर्यंत अयोग्यच आहे. या इतिहासाची मला पुन्हा जाणीव करून देत आहे. माझे सहकारी आणि अधिकारी मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा वाझे यांनी त्यांच्या व्हाॅट्सअप स्टेटस मधून केला आहे.

मागील 17 वर्ष माझ्याकडे अपेक्षा, सहनशीलता, आयुष्य आणि नोकरीही होती. पण आता माझ्याकडे आयुष्याची 17 वर्षही नाहीत. ना नोकरी, ना जगण्याची आशा नाही, असं वाझे यांनी या स्टेटस मध्ये म्हटलं आहे. तर जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे, असं वाझे म्हणाले आहेत.

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणावरून विधानसभेत विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतल्याने सरकारला सचिन वाझेंवर कारवाई करत त्यांची बदली करावी लागली. नुकतीच त्यांची सीबीडीमध्ये बदली करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

…अन् लग्नानंतर उलगडलं 25 वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य; वाचा संपूर्ण प्रकार

‘…म्हणून मला ऐश्वर्याचा राग येतो’; श्वेता बच्चनने सांगितलं कारण

‘पैसे नसतील तर शरीरसुख दे, त्यानंतर ऑर्डर काढतो’; अधिकाऱ्याची महिलेकडे धक्कादायक मागणी

नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित आणखी एक चित्रपट येतोय; ‘हा’ अभिनेता साकारणार मोदींची भूमिका

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अखेर अटक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More