बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप ही मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात”

मुंबई | भाजपच्या आर्ट कल्चर सेलचे बिहार संयोजक वरुणकुमार सिंह यांनी सुशांतचा फोटो असलेले स्टिकर्स छापले आहेत. या स्टिकर्सवर ना भूले हैं, ना भूलने देंगे असं लिहिलंय.

वरुणकुमार सिंह यांनी स्टिकर्स जारी केले आहेत. या स्टिकर्सवर सुशांतसिंग राजपूतचा फोटो आहे. ‘जस्टिस फॉर सुशांत’ असं फोटोच्या वरती लिहिलेलं आहे.

या स्टिकर्सवर भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ सुद्धा आहे. कमळाच्या चिन्हाखाली ‘आर्ट अँड कल्चर सेल, भाजप, बिहार प्रदेश’ असं लिहिलं आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.

सुशांतच्या छापलेल्या स्टिकरवरुन सावंत यांनी, भाजप ही मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात आहे, यात शंका नाही, अशी टीका केली आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून सुशांतच्या मृत्युप्रकरणाचा फायदा उठवण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात मास्क न घालणाऱ्यांवर मोठी कारवाई; आतापर्यंत इतका दंड वसूल!

…तर भारतीय अमेरिकन नागरिकांचे मत आम्हाला मिळेल- डोनाल्ड ट्रम्प

सुशांतसिंग प्रकरणात मोठी कारवाई; आता ‘या’ व्यक्तीला केलं अटक

अभिनेता रजनीकांत यांनी घेतली महागडी लेम्बोर्गिनी उरूस, किंमत ऐकून थक्क व्हाल…!

मी कुणाच्याही दबावाला जुमानत नाही; पिंपरी-चिंचवडमध्ये कृष्ण प्रकाश यांची ‘दबंग’ एन्ट्री!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More