मुंबई | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मासिक जनमानसाची शिदोरी मध्ये वि. दा. सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरुनच आहे, त्यामुळे शिदोरीचा अंक मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी घेतली आहे.
काँग्रेसने राष्ट्रपुरूषांना अपमानित करण्याची मालिका सुरू केली आहे. काँग्रेसचं मुखपत्रं ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यावीर स्वारकरांना अपमानित करणारा लेख लिहीला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र शिदोरीचा अंक मागे घेणार नसल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी इतिहास माहित नसावा पण आपल्या राजकीय स्वार्थासाठी सतत सावरकरांचा विषय पेटवण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहे, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा टाकण्याच प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यात त्यांना यश येणार नाही, असा टोला सचिन सावंत यांनी फडणवीसांना लगावला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मासिक जनमानसाची शिदोरी मध्ये वि. दा. सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरुनच आहे, त्यामुळे शिदोरीचा अंक मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही: मा. सचिन सावंतhttps://t.co/TxKKdwAQq4
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 13, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
सिलेंडर घेऊन बसलेल्या स्मृती इराणींचा फोटो ट्विट करत राहुल गांधी म्हणाले…
पुण्यात थांबून राज ठाकरेंनी घेतला ‘या’ व्यक्तीचा सल्ला!
महत्वाच्या बातम्या-
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदूरीकर महाराजांना पहिला झटका!
‘सत्ता जाऊन सहा वर्षे झाली तरी अनेकजण मंत्र्यासारखेच वागतात’; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
शेतकऱ्यांकडून महावितरणाने केली 22 हजार कोटींची लूट!
Comments are closed.