भाजीपाल्याप्रमाणे आता कडधान्यही थेट ग्राहकांच्या दारी- सदाभाऊ खोत

ठाणे | शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्याप्रमाणे भाजीपाला नियमनमुक्त केला, त्याप्रमाणे कडधान्ये नियमुक्त करण्याचे संकेत कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत. ठाण्यात आंबा आणि धान्य महोत्सवाचा शुभारंभ सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

कडधान्ये नियमनमुक्त करण्यासंदर्भातील पत्र लवकरच मुख्यमंत्र्यांना दिले जाणार आहे. त्यानंतर यासंदर्भातील निर्णय होईल. दरम्यान, भाजीपाल्याप्रमाणेच शेतकऱ्याचे कडधान्य थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या