बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालेलं असेल”

सांगली | भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये उतरवलं. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने  कोल्हापूरला निघाले होते.

कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. यानंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांंनी आक्रमक पवित्रा घेतला

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालेलं असेल, असा उघड इशाराच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांंनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना झाले असताना, त्यांना कोल्हापुरात येण्यापासून रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून त्यांना खुली धमकी देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार हे राज्य तुम्ही गुंडांची टोळी म्हणून चालवत आहात काय?, असा सवाल त्यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या- 

‘मुख्यमंत्री तुम्ही भगवा सोडून हिरवा धारण करा पण…’, सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

पुण्यातील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, तिथं चाललेला प्रकार पाहून पोलिसही हादरले!

भारताचं टेंशन वाढलं; तालिबानने ‘या’ कुख्यात दहशतवाद्याची तुरूंगातून केली सुटका

औरंगाबादमध्ये भीषण अपघात; आई ठार तर दोन चिमुकले गंभीर जखमी

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More