बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊंनी आपल्या शेतात करावा”

पुणे | राज्यात मागीस काही दिवसांपासून ऊसाच्या एफआरपीचा मुद्दा गाजताना दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यामध्ये या मुद्द्यावर बैठक पार पडली आहे. या बैठकीत राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीच्या ऊस परिषदेमध्ये 19 ऑक्टोबरला ठराव संमत करून घेतले. त्याची प्रत शेखर गायकवाड यांना राजू शेट्टींनी दिली आहे.

हर्बल तंबाखू पिकवण्यास परवानगी द्यावी, असं पत्र सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लिहीलं आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना शेट्टी म्हणाले की हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊंनी आपल्या शेतात करावा, असा टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊंच्या पत्रावरून लगावला आहे.

राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्याविषयी अधिक भाष्य करायचं टाळत, मी त्या माणसावर जास्त बोलणार नाही, अशी राजू शेट्टींनी टिप्पणी केली आहे. मी महाविकास आघाडीवर नाराज आणि भाजपवर खूश असं काही नाही. माझी वाटचाल ही अशीच सुरू राहणार जो आडवा येईल त्याला तुडवायचा असं धोरण आपलं कायम असणार आहे, असं शेट्टींनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी द्यावी. डिसेंबरमध्ये तीन हजार तीनशे आणि राहिलेली रक्कम जानेवारी पर्यंत द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाची रक्कम टप्प्या टप्प्यात एफआरपीची रक्कम दिली जाते. जवळपास 32 महिने पैसे त्यांना दिले जात नाहीत. त्याच्या व्याजाचं काय? असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या –

नवाब मलिक म्हणतात, “मला राजस्थानमधून धमकीचा फोन येतोय, समीर वानखेडेंना…”

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांनी सोडलं मौन, मांडली जरंडेश्वरची कुंडली

1 नोव्हेंबरपासून व्हॅट्सअॅप होणार बंद, ‘या’ अँड्राॅइड फोनवर व्हाॅट्सअ‌ॅप होणार बंद

काँग्रेसचं टेन्शन वाढलं; पंजाबच्या राजकीय मैदानात आता ‘हा’ पक्ष करणार एन्ट्री

‘…त्यामुळे यावेळेस भारताचा पराभव होईल’; हाय होल्टेज सामन्यापूर्वी बाबर आझमचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More