बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शांतीचा संदेश देणाऱ्या ‘MIT’मध्ये साध्वी प्रज्ञांचं वेबिनार, विद्यार्थी संघटनांचा विरोध

पुणे | आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर चर्चेत असतात. मात्र पुण्यातील एका कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावल्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. पुण्यातील प्रसिद्ध एमआयटी विद्यापीठामध्ये त्यांना मार्गदर्शनाला बोलावलं होतं. यावरून विद्यार्थी संघटना आक्रमक भूमिका घेतली आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेले एमआयटी विद्यापीठात एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट नावाचा चालवला जाणारा हा कोर्स विद्यार्थ्यांना राजकीय नेतृत्व घडवण्यासंबंधी शिक्षण आणि प्रशिक्षण देतो, त्यांना मार्गदर्शन करणारं हे वेबिनार आयोजित केलं होतं. या ऑनलाईन वेबिनारमध्ये साध्वी प्रज्ञा यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी प्रज्ञा यांनी मार्गदर्शन देखील केलं.

साध्वी यांच्या वेबिनारवर काही विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. सदर व्यक्तीची पार्श्वभूमी माहीत आहे, तरीही साध्वी प्रज्ञा यांना मार्गदर्शनास बोलावून कोणता अजेंडा राबवायचा आहे?, असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित करण्यात आला आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्था मुळातच संवैधानिक विचारांची केंद्र तयार होणं अपेक्षित आहे. त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आणि शहिद हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या अशा वादग्रस्त व्यक्तीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला लावून एमआयटीला नेमकं काय साध्य करायचंय?, असा सवाल स्टुडंट हेल्पिंग् हॅंड्स संस्थेचे कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात प्रज्ञा साध्वी यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अशा व्यक्तींना मार्गदर्शनासाठी बोलावणं कितपत योग्य आहे, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“माजी मुख्यमंत्री सुज्ञान आहेत, मात्र…”; नाशिक पोलीस आयुक्तांचं देवेंद्र फडणवीसांना सडेतोड उत्तर

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे!

“पोलिसांनी मला अटक केली नव्हती, मी स्वत: कोर्टात गेलो होतो”

पवार साहेब याला मुख्यमंत्री केला, याचा सुसंस्कृतपणा बघा- नारायण राणे

‘…म्हणून मी ते वक्तव्य केलं’; वादग्रस्त वक्तव्यावर नारायण राणेंचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More