बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात सत्ताबदल होणार?; उदयनराजेंना ‘या’ शिवसेना नेत्यानं वापरलेल्या वाक्यानं चर्चांना उधाण

सातारा | गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांवर आरोप होत आहेत. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका तरूणीने बलात्काराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणानंतर शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणात अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. हे कुठे शांत झालं नाही तर आता सचिन वाझे प्रकरणात माजी पोलीस आयुक्तांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. विरोधकांनीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. मात्र अशातच शिवसेनेतर्फे निवडणूक लढवलेले नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अजब वक्तव्य केलं आहे.

शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवलेले मात्र आता शिवसेनेचे नसलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची साताऱ्यात भाजपचे खासदार उदयनराजे यांच्याशी रात्री रस्त्यात अचानक भेट झाली. गळाभेट घेताना नरेंद्र पाटलांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महाराज साहेब, साहेब आता मुख्यमंत्री होताहेत. काळजी नाही आता, असं पाटील म्हणाले. पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि नंतर पक्ष सोडला. मात्र नरेंद्र पाटील यांच्या या वक्तव्यामुळे सत्तांतर होण्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. सध्या सचिन वाझे प्रकरणातील माजी आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

दरम्यान, परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी अस्वस्थ होऊन थेट मुख्यमंत्र्यांना आठ पानांचं पत्र लिहिलं. या पत्रामध्ये सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप लावले होते. मात्र देशमुखांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तर विरोधी पक्षाने या प्रकरणात आक्रमक भुमिका घेत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“फडणवीसांच्या मोदी-शहा भेटीनंतर सिंह यांनी पत्र दिलं म्हणूनच संशय येतोय”

‘…तर आदरणीय पवारजींना जाब विचारायला हवा’; काँग्रेस नेत्याचा शरद पवारांवर निशाणा

सरकारमधील प्रत्येकानं आपले पाय जमिनीवर आहेत का पाहावं- संजय राऊत

‘…म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पण 100 कोटीमध्ये हिस्सा होता’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

गृहमंत्री अनिल देशमुखांसह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा- तृप्ती देसाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More