बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर संपूर्ण आशियाला भयंकर आणि विनाशकारी परिणाम भोगावे लागतील”

बीजिंग | चीन आणि तैवान यांच्यातील तणाव अनेक दिवसांपासून वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चीन तैवानवर दबाव वाढवत आहे. त्यातच आता तैवानच्या राष्ट्राध्यक्षा साई इंग-वेन यांनी इशारा दिला आहे. जर चीनने तैवानवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर संपुर्ण आशियाला भयंकर आणि विनाशकारी परिणाम भोगावे लागतील, असा इशारा साई इंग-वेन यांनी दिला आहे.

चीन तैवानवर दबाव वाढवत असल्यामुळे साई इंग-वेन यांनी या विषयावर भाष्य केलं आहे. तैवानला लष्करी संघर्ष नको आहे. मात्र, तैवान स्वत:चे रक्षण करण्यासाठी जे काही करावं लागणार आहे ते करण्यासाठी चुकणार नाही, असं साई इंग-वेन म्हणाल्या. त्यासंदर्भात त्यांनी परराष्ट्र व्यवहार मासिकात लेख देखील लिहिला आहे.

तैवान हा स्वत: ला एक लोकशाही असलेला देश मानतो. परंतु, चीनने तैवान हा चीनचा भाग असल्याच वारंवार सांगितल आहे. यापुर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानला चीनशी निश्चितपणे जोडण्यात येईल, असं म्हटलं होतं.

दरम्यान, 2016 च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडू आल्यानंतर साई इंग-वेन यांनी तैवान स्वतंत्र राष्ट्र दावा अनेकवेळा केला आहे. परंतु, चीनने तैवानमध्ये अतिक्रमण करत चीनच्या राष्ट्रदिनी 38 लढावू विमाने तैवानच्या हद्दीतुन दोन वेळेस उडवली. तसेच चीन आतापर्यंत एकदाही तैवानवर लष्करी हल्ला करू शकला नाही.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! या कारणामुळे पुणे विमानतळ ‘इतक्या’ दिवसांसाठी राहणार बंद

“भाजपसोबत ठरलेलं लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली”

“क्रूरपणाची परिसीमा पार करणाऱ्या भाजपचा माज जनतेनंच उतरवला पाहिजे”

अजित दादा, बच्चू कडूंना समज द्या- अमोल मिटकरी

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More