बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तू काय ज्येष्ठ नागरिक आहेस का?’; कोरोनाची लस घेतल्यावर सैफ होतोय ट्रोल!

मुंबई | कोरोनाचा सध्या प्रादुर्भाव वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. 1 मार्चपासून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. त्यासोबतच 45-60 वर्षाच्या नागरिकांनाही लस दिली जात आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खाननेही लस घेतली आहे. मात्र त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

सोशल मीडियावर सैफवर भन्नाट मीम्स केले जात आहेत तर तू काय ज्येष्ठ नागरिक आहेस का?, असं म्हणत त्याची खिल्ली उडवली जात आहे. इंस्टाग्रामच्या व्हायरभायनी या अकाउंटवर सैफचा लस घेतानाचा शेअर केला आहे. त्याचा या व्हिडीओवर लोकांनी कमेंट करताना त्याला ट्रोल केलं आहे.

तुला कोरोनाची लस कशी काय मिळाली?, तू देखील जेष्ठ नागरिक झालास का?, सेलिब्रिटींसाठी सरकार नियम मोडत आहे का, असंही नेटकरी म्हणाले. या लसीकरणाच्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे.

दरम्यान, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेले 45 वर्षांवरील नागरिक लस घेऊ शकतात. लस घेण्यास पात्र व्यक्ती खासगी रुग्णालयातून काेराेनाची लस टाेचून घेऊ शकतात. तर लसीची किंमत 250 रुपये असून 100 रुपये सेवेसाठी आकारण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालये यापेक्षा जास्त शुल्क आकारू शकत नाहीत, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या-

‘कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला…’; चंद्रकांत पाटलांची महाविकासआघाडीवर सडकून टीका

…तर मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचं सत्य बाहेर येणार नाही- संजय राऊत

‘…नाहीतर काही लोक स्वत:साठी मागतात’; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला

मनसुख हिरेनची हत्या की आत्महत्या? प्रत्यक्षदर्शीनं केलाय सर्वात मोठा खुलासा…

वडील आणि 84 वर्षीय आजोबांची हत्या करून तरूणाने उचललं धक्कादायक पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More