सायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात

सायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात

हैदराबाद | भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि पी.कश्यप आज विवाहबंधनात अडकले आहेत. याबाबत सायना नेहवाल हिने ट्विटर वरून फोटो शेअर केले आहेत.

सायना नेहवाल आणि पी.कश्यप हे भारताचे बॅडमिंटन या खेळातील प्रमुख खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी भारताला अनेक पदके मिळवून दिली आहेत.

सायना नेहवाल आणि पी.कश्यप यांची ओळख 2005 साली पी. गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमी मध्ये झाली होती.

दरम्यान, सायना नेहवाल आणि पी. कश्यप यांचं रिसेप्शन 16 डिसेंबर रोजी हैदराबाद मध्ये होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

-रवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर

-सोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार?

-“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी

-जेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात!

-हॉकी विश्वकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगल

Google+ Linkedin