Top News

वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत, इथं तडजोड नाही; संजय राऊत

मुंबई | मी काही राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. यालाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे, असा टोला संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना लगावला आहे.

नेहरू ,गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे.

राहुल गांधी यांनी एका सभेत बोलताना भाजपने ‘मेक इन इंडिया’चं ‘रेप इन इंडिया’ केलं, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन लोकसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. राहुल यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी लावून धरली होती. मात्र राहुल गांधींनी मी काही राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, असं म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या