Top News मुंबई

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड करणार- मुख्यमंत्री

मुंबई | मुंबईत मे आणि जून महिन्यातील पाणी कपात टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठी निर्णय घेतला आहे. यासाठी मनोरच्या समुद्राचे 200 एमएलडी खारं पाणी गोडं करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणारे.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये निःक्षारीकरणाच्या प्रकल्प उभारीकरणाचा आढावा घेऊन पुढील प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

मुख्यमंत्री म्हणाले, “मनोर इथल्या पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. शिवाय या ठिकाणी शासनाचा भूखंड आणि रस्तेही उपलब्ध आहेत. या ठिकाणी नागरी वसाहत नसल्याने हा प्रकल्प विनाव्यत्यय पूर्ण होऊ शकतो. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना कपातीविना पाणी पुरवठा करणं शक्य होणार आहे.”

अनेक देशांमध्ये समुद्राचं खारं पाणी गोड करण्याचा प्रयोग यशस्वी झालाय. त्याचप्रमाणे काही देशांमध्ये या प्रकल्पांची उभारणी सुरुये. मुंबईसारख्या महानगरात हा प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरणार, असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

असंच काम करा, म्हणजे आम्हाला बोलावं लागणार नाही; मनसेचा शिवसेनेला टोला

राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना कधीही टरबुज्या म्हटलेलं नाही, मात्र….- जयंत पाटील

शरद पवार हे 4 खासदारांचे लोकनेते; गोपीचंद पडळकर यांनी टीका

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि पथकावर ड्रग्ज पेडलर्सचा हल्ला

प्रेस नाव असलेली गाडी पुणे पोलिसांनी अडवली अन् समोर आली धक्कादायक माहिती!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या