बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलाम त्यांच्या कार्याला! जीव धोक्यात घालत केलं लसीकरण पूर्ण

औरंगाबाद | कोरोनानं (Corona) गेल्या दोन वर्षापासून मृत्यूचा तांडवच लावला आहे. या काळात कोरोनानं लाखो लोकांचे बळी घेतले. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिम राबवल्या गेल्या. लसीकरणामुळे कोरोना बऱ्याच अंशी आटोक्यात आल्याचं पहायला मिळालं.

कोरोना लसीकरण (Vaccination) करणं अनिवार्य केल्यामुळे प्रत्येक नागरिकांना लस घेणं सक्तीचं केलं आहे. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचारीही बरीच मेहनत घेत असल्याचं दिसत आहे. ज्या ठिकाणी सोई-सुविधा नाही त्या ठिकणीही लस पोहचवण्यासाठी बरीच मेहनत घेत आहे. अशीच काहीशी आणखी एक घटना समोर आली आहे.

औरंगाबादमध्ये जीव धोक्यात घालून रस्ता नसतानाही चक्क नदीच्या पात्रातून लाकडाच्या ओंडक्यावर चालत शेतात राहणाऱ्या कुटुंबातील लोकांना लसीकरण देण्यासाठी आरोग्य कर्माचाऱ्यांनी मेहनत घेतली.

दरम्यान, औरंगाबादमध्ये अजूनही संपूर्ण लसीकरण झालं नाही त्यामुळे औरंगाबाद जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, रोज 60 हजारपेक्षा अधिक लोकांना लस देण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“मी आता आई होण्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही”

“तुला मराठी ठाऊक नाही का? हा महाराष्ट्र आहे…”, राज्यपाल कोश्यारी संतापले

चिंता वाढली! देशातील 13 राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकणार

“2024 ला महाविकास आघाडीचंच माॅडेल, तिन्ही पक्ष एकत्र लढले तर…”

राज कुंद्राला मोठा झटका; अश्लील व्हिडीओ प्रकरणी पुन्हा अडचणीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More