मुंबई | राज्यात होत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासारख्या राज्यात कुटुंबच्या-कुटुंबं रोज आत्महत्या करीत आहेत. विकासाच्या नावाखाली ‘अराजक’ हेच तुमचे अच्छे दिन असतील तर त्या अराजकात गरीबांच्या सामुदायिक आत्महत्यांचीच आहुती पडणार आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
दरम्यान, विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचे त्यासाठी अभिनंदन! पण उर्वरित महाराष्ट्रात शेतकरी, गरीब, मजूर, विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. त्यांचा आक्रोश आणि किंकाळ्या नागपुरात दडपून टाकू नका, असंही त्यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!
-संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी
-पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या फेसबुक पोस्टचं सोलापूर कनेक्शन!
-अंकुर करपले; पावसा आता तरी तुला दया येईल का रे???
-पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग; पतीविरोधात गुन्हा दाखल
Comments are closed.