बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, मग रातोरात मुख्यमंत्री का बदलला?”

मुंबई | गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून विजय रूपाणी यांनी हटवण्यात आलं. त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लावली आहे. भाजप करत असलेल्या फेरबदलावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

लोकशाहीचं, राज्यकारभाराचं आणि विकासाचं गुजरात मॉडेल अशा प्रकारे फुगा फुटावा तसं टपकन फुटलं आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होतं, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा करत सवाल संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

भूपेंद्र पटेल यांची निवड आमदारांकडून एकमताने झाली, पण भूपेंद्र यांनाही आपण मुख्यमंत्री होतोय हे माहीत नव्हते. गेल्या चार वर्षांत त्यांना साधे मंत्रीही केले नव्हते. ते एकदम मुख्यमंत्रीच झाले, दिल्लीहून नाव आलं आणि ते भाजपच्या विधिमंडळ पक्षाने मान्य केलं, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, नेता निवडीसाठी आमदारांनी मतदान केलं असतं तर दुसऱ्याच एखाद्या नावावर पसंतीची मोहोर उठली असती, अग्रलेखात सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

शेतकरी बांधवांनो खचून जाऊ नका, सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी- धनंजय मुंडे

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

अमेरिकेचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानला करणार ‘इतक्या’ मिलीयन डाॅलर्सची मदत

शक्ती कायद्याबाबत गृहमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More