बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु, पुण्यातील रुग्णालयाची संभाजी ब्रिगेडकडून लाईव्ह पोलखोल

पुणे | राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषत: पुण्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यात एकीकडे वाढत्या रूग्णसंख्येमुळे रूग्णांना बेड मिळत नाहीये. अशात पुण्यातील काही रूग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं चित्र आहे.

संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य संघटक प्रदिप कणसे यांनी फेसबुक लाईव्ह करत पुण्यातील नऱ्हे परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या चव्हाण रुग्णालयाचं भयावह वास्तव सर्वांसमोर मांडलं आहे. या रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण झालेलं नसताना रूग्णालय सुरू करण्यात आल्याचा आरोप प्रदिप कणसे यांनी केला आहे. तसेच रूग्णालयाच्या कारभारामुळे आमचा रूग्ण दगावल्याचं कणसे यांनी सांगितलं आहे.

ज्या रुग्णालयाला परवानगीच नाही, असं रुग्णालय कोरोनाच्या जागतिक संकटाच्या काळात चालूच कसं शकतं.. ज्यावेळी आम्ही रुग्णालय प्रशासनाला बोलण्याचा, काही विचारण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळी रुग्णालय प्रशासन अरेरावारीची भाषा वापरत आहे, असं कणसे यांनी सांगितलं.

आमची पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी आहे की सविस्तर प्रकरणात आपण लक्ष घालून आवश्यक ती तातडीची पावले उचलावीत आणि संबंधित रुग्णालयाव तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कणसे यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात रुग्णांना बेड मिळेना; कोरोना पॉझिटिव्ह आईने मुलासमोर रस्त्यावरच सोडले प्राण

वाढत्या कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय!

पुण्यातील हृदयद्रावक घटना, कार धरणात कोसळल्याने आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

…तर अजित पवारांना फोन केला तरी बेड मिळायचे नाहीत- अजित पवार

“फक्त सल्ले देण्याचे उद्योग नका करू, 50 डॉक्टर्स पण द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More