कोल्हापूर | पन्हाळगडाकडे दुर्लक्ष केल्याने शिवप्रेमी आणि किल्लेप्रेमी नाराज आहेत, त्यामुळे तातडीने याप्रकरणात लक्ष घालून प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याचे तातडीने आदेश देण्यात यावे अशा आशयाचे पत्र संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठविले आहे. प्रशासन आणि स्थानिक नगरपालिका याकडे लक्ष देत नसून त्यावर शिवप्रेमी नाराज आहेत, असे संभाजीराजे म्हणाले.
महाराष्ट्रात ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या तीन राजधानींच्या किल्ल्यांपैकी एक असलेला आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणूक ओळख असलेला पन्हाळगड किल्ला (Panhala Fort) अखेरची घटका मोजत आहे. पावसाने किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज ढासळले असून अनेक ठिकाणी किल्ल्याला भेगाही पडत आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली गावे जीव मुठीत धरुन जगत आहेत. बुरुज आणि तटबंदी कोसळल्याने पायथ्यावर असलेल्या गावांत मोठमोठे दगड आणि पाण्याचे लोट येत आहेत. दुर्दैवाने जर या ठिकाणी कोणती जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण रहाणार? प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे, असे देखील पत्रात म्हटले आहे.
पन्हाळा केंद्रीय पुरातत्व खात्याचा पुर्णवेळ पदाधिकारी नसल्याने, ही जबाबदारी राज्यशासनावर येते. वेळीच पावले उचलली नाहीत तर, छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि ताराराणी (Tararani) यांचा वारसा लाभलेला हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भिती आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीने लक्ष घालून ताबडतोब कारवाईचे आदेश देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली गेली आहे.
थोडक्यात बातम्या –
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, सीएनजी आणि पीएनजी ‘इतक्या’ रूपयांनी महागलं
‘…त्यामुळे औरंगाबादचं नाव बदलू देणार नाही’, इम्तियाज जलील आक्रमक
नवीन संसद भवनाच्या राष्ट्रचिन्हावरुन वाद, ‘या’ कारणामुळे विरोधक आक्रमक
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा झटका!
भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल; महिलेने केले अत्यंत गंभीर आरोप
Comments are closed.