बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक; केली ‘ही’ मोठी घोषणा

रायगड | मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. अशातच आता खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापण्याची शक्यता आहे. अशातच संभाजीराजे या मुद्द्यावरुन लाँग मार्च काढणार असल्याचा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी रायगड ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासाठी तयारीला लागण्याचे आदेश देखील संभाजीराजे यांनी दिले आहेत. संभाजीराजे रायगडमधून आपली जनसंवाद यात्रा सुरू करणार आहेत.

मराठा आरक्षणाच्या तसेच इतर मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे. या सरकारला जागं करण्यासाठी मराठा समाजाने पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्याची तयारी ठेवावी, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्याची सुरूवात ही रायगडमधून होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, खोपोली येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संभाजीराजे यांनी अभिवादन केलं. शाहू महाराजांनी आरक्षण देत असताना ठेवलेला व्यापक दृष्टिकोन लक्षात ठेऊन डॉ. बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केल्याच देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

‘समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत आहे’, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

‘त्या’ लेटर बाॅम्बवर क्रांती रेडकरचं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर, म्हणाली…

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याने केली समीर वानखेडेंची पाठराखण, पाहा व्हिडीओ

“इतकी लाळ चाटेगिरी करण्यासाठी किती वसूली केली?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More