बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्या प्रकृतीसाठी आणि समाजासाठी हे उपोषण थांबणं गरजेचं”

मुंबई | दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छत्रपती संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत. 26 तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानात हे उपोषण सुरु करण्यात आलं असून संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलंच चिघळल्याचं पहायला मिळत आहे.

उपोषणाचा आज तिसरा दिवस असून संभाजीराजेंची प्रकृती ढासळत चालल्याचं दिसत आहे. डाॅक्टरांनी तपासणी केली असता ब्लडप्रेशर लो झाल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकारने संभाजीराजे यांना चर्चेसाठी निमंत्रण धाडलं असून प्रतिनिधी वर्षावर चर्चेला जातील, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.

खूप त्रास होऊ लागलाय, पण तरीही समाजाठी मी झटणार आहे, अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतली आहे. कोणताही अहंकार मनात ठेवण्यापेक्षा समाजाचा प्रश्न मार्गी लागणं महत्वाचं आहे. त्यामुळे आता माझ्या प्रकृतीसाठी आणि समाजासाठी हे उपोषण थांबणं गरजेचं आहे.

दरम्यान, मी उपोषण करत आहे, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“… त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, मुख्यमंत्री महोदय अजून किती सहन करायचं”

MSEB विरोधात शेतकरी आक्रमक, अज्ञातानं सबस्टेशन पेटवलं

“उद्धवजी अजूनही वेळ गेली नाही, विचार करा”

‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य

“…तर मी धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More