…म्हणून मी निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नाही- संभाजीराजे छत्रपती
मुंबई | घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरिब लोकांना न्याय देण्यासाठी मी स्वराज्याच्या माध्यमातून उभा राहणार आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणालेत. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
आमच्यात राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सर्व चर्चा झाली होती. सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तबही झाले होते. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला. या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटत आहे, असं संभाजीराजे म्हणाले
मी सांगतोय त्यापैकी एकही शब्द खोटा असेल तर मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवछत्रपतींच्या कोणत्याही स्मारकावर यायला तयार आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, मी खोटं बोलत आहे, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेनेनं ऑफर दिली ती स्वीकारली असती तर मी खासदार झालो असतो. मला सर्व आमदार म्हणत आहेत की, आपण निवडणूक लढवावी. परंतु मला माहिती आहे, त्याठिकाणी घोडेबाजार होणार आहे, मी निवडणूक लढवणार नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती- संभाजीराजे
कोरोना पूर्णपणे गेलेला नाही तो पुन्हा वाढतोय, मास्क घालत रहा- उद्धव ठाकरे
Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर
“राक्षसी वृत्तीचं मुंडकं छाटल्याशिवाय मसनातील महाकाली शांत होणार नाही”
अनिल परबांवरील कारवाईनंतर अजित पवारांचा खळबळजनक आरोप, म्हणाले…
Comments are closed.