बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशसेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल- समीर वानखेडे

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधत असून, क्रूझवरच्या कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मालदीव आणि दुबईतील फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून NCB च्या वसुलीबद्दल नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले होते.

समीर वानखेडेंच्या पोस्टींगबद्दल मलिक यांनी आरोप केले होते. आता एनसीबीने हे आरोप फेटाळले असून प्रेसनोट जारी केली आहे. तर, समीर वानखेडे यांनीही आरोप फेटाळत मी तुरुंगात जायलाही तयार असल्याचं म्हटलंय.

मलिकांच्या आरोपांवर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितल की नवाब मलिक खोटारडे आहेत आणि वानखेडे मलिकांवर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करतील.

मंत्री मलिक यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मी छोटासा सरकारी नोकर आहे, ते मोठे मंत्री आहेत. जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी, ड्रग्जविरोधी काम करण्यासाठी ते मला तुरुंगात टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, असंही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्र हादरला! एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

‘नरेंद्र मोदींच्या भीतीच्या 35 हजार उद्योजकांनी देश सोडला’; अर्थमंत्र्यांची टीका

लहान मुलांच्या लसीकरणानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे; तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

‘भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानला जास्त संधी’; मुल्तानच्या सुल्तानचं मोठं वक्तव्य

एनसीबी-एनसीपी वाद पेटला! वानखेडे म्हणतात मी नव्हतोच, मलिकांनी पुरावे दाखवले

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More