बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर समीर वानखेडेंची बदली; आता ‘या’ विभागाची जबाबदारी सांभाळणार

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) चांगलेच चर्चेत आले. त्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ पहायला मिळाली. अशातच आता याप्रकरणी आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. वानखेडे यांची अखेर डीआरआय विभागात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच चर्चा होत असलेली पहायला मिळत आहे.

वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ संपलाय. त्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्वीच्या डीआरआय म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागामध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र तरीही मलिकांची आरोपांची मालिका काही संपली नाही. आता त्यांनी समीर वानखेडेंच्या बदलीवरुनही टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, वानखडे यांनी अद्याप पदभार सोडलेला नसून ते गोवा येथे एका गुन्ह्यांच्या तपासासाठी गेले असल्याची माहिती आहे. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने गोव्यात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

तो खूपच हाॅट आहे! कार्तिकनंतर सारा अली खान आता ‘या’ अभिनेत्यावर फिदा

पुन्हा सगळंं ऑनलाईन: ‘या’ भागात 1 ली ते 9 वीच्या शाळा बंद

…म्हणून बॉयफ्रेंडने दिला सेक्स करण्यास नकार, अट ऐकून व्हाल चकीत

पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन?; महापौरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार, अभिजित बिचुकलेची ‘या’ अभिनेत्रीसोबत हमरीतुमरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More