बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अर्णब गोस्वामींच्या अटकेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी आज सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केलीये. या घटनेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये.

महाराष्ट्रात सर्व कायद्याने काम चालतं. त्यामुळे आमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावरही अन्याय करत नाहीत, असं म्हणत त्यांनी अटकेचं समर्थन केलं आहे.

राऊत पुढे म्हणाले, “जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्यानंतर तपासातून हाती लागलेल्या पुराव्यांनुसार पोलिसांनी कारवाई केली असेल. या गोष्टींशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध असण्याचं कारण नाहीये.”

संजय राऊत म्हणतात, “आपल्या देशात प्रसारमाध्यमांना सर्वात जास्त स्वातंत्र्य आहे. इतकं स्वातंत्र्य कुठेच नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये पत्रकारांवर कडक कारवाई केली जाते, मात्र त्याबद्दल कोणी बोलत नाही.”

महत्त्वाच्या बातम्या –

आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये- सुभाष देसाई

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

“गेल्या 20 वर्षात प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला”

कोकणामधून शिवसेनेला हद्दपार करणार; नारायण राणेंचं वक्तव्य

कंगणा राणावतच्या अडचणींत वाढ; गीतकार जावेद अख्तर यांनी केला अब्रू नुकसानीचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More