बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोणीही काहीही म्हणू देत, पण ‘फिर एक बार मोदी सरकार’च- उद्धव ठाकरे

मुंबई | काँग्रेस, महाआघाडी किंवा कोणीही काहीही म्हणू देत, देशातील जनतेने मात्र ‘फिर एक बार…’च्या घोषणेवर शिक्कामोर्तब केले आहे. 23 तारखेला ते दिसेलच!, असं म्हणत सामना संपादकीयातून पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सामना संपाकदीयातून प्रचाराच्या पातळीविषयी भाष्य करण्यात आलं आहे. 38 दिवसांच्या प्रचार काळात सर्व पक्षीय नेत्यांनी प्रचाराचा ‘शिमगा’ केल्याने सार्वत्रिक निवडणुकांना लोकशाहीचा पवित्र सण का म्हणायचे, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

लोकशाहीचा सण इतर सणांपेक्षाही अधिक उत्साहाचा, चैतन्याचा, आनंदाचा आणि निकोप स्पर्धेचा का असू नये? पण तसे न होता लोकशाहीच्या या पवित्र सणाचे रूपांतर शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या शिमग्याच्या सणात झाले आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

मात्र यासाठी कुठल्याही एका राजकीय पक्षाला जबाबदार धरून चालणार नाही. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या परीने निवडणुकीचा शिमगा करण्यास हातभार लावला, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीत फुट; आंबेडकरांवर गंभीर आरोप करत ‘या’ नेत्याचा राजीनामा

-“लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकातील सरकार कोसळणार”

-श्री श्री गोडसे यांना लवकरच ‘भारतरत्न’ देण्याची मागणी होईल- असदुद्दीन ओवैसी

-“अशा देशभक्तांपेक्षा देशद्रोही म्हणून घेणं अधिक अभिमानाचं”

-नथूराम गोडसे दहशतवादीच होता- प्रकाश आंबेडकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More