मुंबई | काही तासांच्या पावसामुळे नागपूर जलमय झाले. रोडवरच नाहीतर अधिवेशन कार्यक्रमातही पाणी साचल्याने अधिवेशनाचं कामकाज पूर्ण दिवसासाठी स्थगीत करण्यात आलं. यावरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
एरवी पावसामुळे मुंबईच्या भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली होSS’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे गेले? त्यांना कोणीतरी कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी, असं अग्रलेखात म्हटलंय.
दरम्यान, मुंबई महापालिका आणि शिवसेनेविरुद्ध कोणाला कितीही ठणाणा करू देत, पण काही तासांच्या पावसात नागपूर का बुडाले? कोणामुळे बुडाले? विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याइतकी नाचक्की का ओढवली?, यावर मात्र आम्हाला काहीही म्हणायचे नाही!, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात इंग्लंडचा विजय
-संभाजी भिडेंनी आम्हाला शब्द दिलाय; शिवसेनेचा दावा
-मुख्यमंत्री सहाय्यता निधी लाटण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा डाव फसला, गुन्हे दाखल
-ख्रिश्चनांच्या देशप्रेमाबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य!
-पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी कराल तर आता मार पडेल!
Comments are closed.