मुंबई | देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असणाऱ्या भारतरत्न पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावरुन नाराजीनाट्य सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न सन्मान दिला गेला नाही त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
भारतरत्न नककी कुणाला?
आज नानाजी देशमुख,भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले.
वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी.
शेम शेम— Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2019
वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहेत. तसेच शेम, शेम… असे उद्गारही या ट्विटमध्ये काढण्यात आले आहेत.
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2019
दुसऱ्या एका ट्विटमध्ये विनायका प्राण तळमळला, असं म्हणत भारतरत्न पुरस्काराचा फोटो ट्विट करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची शाळांवर सक्ती
-नाणेफेक जिंकत भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
-युतीसाठी नरेंद्र मोदींची डिनर डिप्लोमसी! उद्धव ठाकरेंना दिलं भोजनाचं निमंत्रण
-बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘पद्मविभूषण’ जाहीर
-नानाजी देशमुख, प्रणव मुखर्जी आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न!