बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज महाराज असते तर…; संभाजीराजेंचा संताप अनावर

मुंबई | वर्ध्यातल्या हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. भाजपचे राज्यसभेचे सहयोगी खासदार संभाजीराजे यांनी ट्वीट करत या घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे.

माणूसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट येथे घडली. त्या नराधमाचा एन्काऊंटर करण्याची मागणी लोक करत असतील तर ते समजण्यासारखे आहे. आयुष्याची स्वप्न डोळ्यासमोर असणाऱ्या एका तरुणीला जीवंत पेटवलं गेलं. हा क्रुरतेचा कळस आहे. हे जरा अतीच होत आहे. आता बास्स! सहनशीलतेचा कडेलोट होत आहे, अशी उद्दीग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र कोणत्या दिशेला वाटचाल करत आहे? हाच का तो शिवरायांचा स्त्रीविषयक आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा महाराष्ट्र? हाच का तो शाहू फुले आंबेडकरांचा स्त्री पुरुष समानता ठेवणारा मानवतावादी, पुरोगामी महाराष्ट्र? हाच का तो परस्त्री सदा बहिणी- माया म्हणणारा साधू संतांचा महाराष्ट्र?, असं ते म्हणाले आहेत.

आज जर महाराज असते, तर ह्या असल्या नराधमाला कोणती शिक्षा केली असती? हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. लोकांना ते समजून जाईल. महाराष्ट्र पोलीसांनी हैद्राबाद पोलीसांचा आदर्श घ्यावा, अशी जनभावना तयार झाली आहे सध्या. याशिवाय अशा नरधमांच्यावर वचक बसणार नाही. आयुष्यात कुणा माता भगिनीकडे वाईट नजरेने बघण्याचं धाडसच काय, विचार सुद्धा मनात आला नाही पाहिजे. असं काही करण्याची गरज आहे. निर्भया असेल किंवा कोपर्डी च्या भगिनीला आज सुद्धा न्याय मिळलेला नाही. याची खंत आजही मनात आहे, असं संंभाजीराजे म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“सैनिकांच्या नावाने मतं मागणाऱ्या भाजपचा खोटारडेपणा कॅगने उघडा केला”

सबुरीने देत नसाल तर खेचून आणू- तानाजी सावंत

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानचा 10 विकेट्सनी धुव्वा; भारताची वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More