मुंबई | सध्या देशात शेतकरी आंदोलनामुळे वातावरण पेटलं आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचं सातव्या दिवशीही आंदोलन सुरू आहे. शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी करत आहेत. याच मुद्यावरून भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीवर निशाणा साधला आहे.
शेतकरी कडाक्याच्या थंडीमध्ये आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्यांसाठी ते निदर्शन करत आहेत. मात्र नरेंद्र मोदी वाराणासीमध्ये संगीतीचा आनंद घेत मान डोलावत घेत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश सिंग यांनी केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना संबित पात्रांनी गांधींवर निशाणा साधला.
मोदीजी किमान वाराणसीला असुदेत ते भारतातच आहेत तर विरोधकांना राग येतो. ते गांधींसारखे बँकॉकला तर गेले नाहीत. ते तिथे नक्की कोणत्या शेतीचा अभ्यास करत आहेत?, असा सवाल करत संबित पात्रा यांनी राहुल गांधींना निशाण्यावर धरलं.
दरम्यान, शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेली बैठक चांगली झाली होती. यामध्ये आम्हाला एक छोटी समिती स्थापन करायची होती, पण चर्चा सर्वांसोबत व्हावी अशी शेतकरी नेत्यांची इच्छा होती, असं कृषीमंत्री तोमर सिंह म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
जलयुक्त शिवार योजना ही सर्वाधिक लोकप्रिय, मात्र सरकारकडून सूड बुद्धीने चौकशी- राम शिंदे
तिसऱ्या वनडेत भारताचं ऑस्ट्रेलियाला 303 रन्सचं आव्हान; पंड्या-जडेजाची अर्धशतकी खेळी
रेखा जरे हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही- संजय राऊत
“माझ्याकडे 13 एकर आहे… तुला काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये”