महाराष्ट्र मुंबई

“बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं पण…”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. यावरून मनसेने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.

जनता प्रचंड अस्वस्थ आहे, चिडलेली आहे त्याचा उद्रेक होवू नये म्हणून लॉकडाऊनची भिती दाखवली जात आहे, असं देशपांडे म्हणाले.

दिवाळीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार असल्याने ते काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. वाढीव विजबीलासारखा ऐरणीवर असलेल्या विषयावर मुख्यमंत्री बोलणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलणं टाळलं, असं संदिप देशपांडे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

सांगितलं होतं पवारांचा नाद करू नका, पण..- धनंजय मुंडे

शहीद जवान संग्राम पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरात दाखल

“पक्षात कुणालाही कोणतंही पद मिळतं, फाईव्ह स्टार कल्चरने निवडणुका जिंकता येत नाहीत”

गोव्यात समविचारी पक्षांशी युतीची तयारी- प्रफुल्ल पटेल

“महामारीचे बाप बनून लोकांच्या जिवाशी का खेळता?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या