Top News

‘सामना’तून केलेल्या टीकेवर संदीप देशपांडेंचं सडेतोड उत्तर

Loading...

मुंबई | मनसेचं गुरूवारी मुंबईत पहिलं राज्यव्यापी अधिवेशन पार पडलं. या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्याचं पहायला मिळालं. त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडाही बदलला आहे. मनसेच्या बदलेल्या भूमिकेवर सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं सडकून टीका केली आहे. शिवसेनेनं केलेल्या टीकेवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला सडतोड उत्तर दिलं आहे.

आधुनिक अफजल खानने मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत आहेत. काळजी करू नका आम्हीच उपचार करू, असं ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला सुनावलं आहे.

देशात शिरलेल्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशी मुसलमानांना हाकलून द्या, असं नाही तर हाकललेच पाहिजे. याविषयी कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण पक्षाने झेंडाच बदलावा ही गोष्ट गमतीची आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, एक नाही तर दोन दोन झेंड्यांची योजना करणं ही गोंधळलेल्या मनस्थितीत किंंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे, असंही शिवसेनेनं सामनामध्ये म्हटलं आहे.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या