महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत…”

मुंबई | मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली. या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

संदीप देशपांडे यांनी संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत संजय राऊत हे राज्यपालांना वाकून दंडवत घालताना दिसत आहेत.

महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. पण असं असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात, असं राऊत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’

“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”

“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

फ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

पंकजा मुंडे शिवसेनेत येणार का?; संजय राऊतांचे सूचक विधान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या