बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”

मुंबई | तौक्ते चक्रीवादळाने हाहाकार माजवला होता. या वादळाने महाराष्ट्रातील किनापपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. या वादळात अनेक गावं उध्वस्त झाली तर काहींची घरसुद्धा गेलीत. त्यासोबतच मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीलाही याचा जबर फटका बसला.

नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसल्यानंतर वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गुजरातला 1 हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली. तर उद्धव ठाकरे यांनी घराच्या बाहेर पडत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, अशी टीका विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. बुधवारीही देशपांडे यांनी मोदींवर टीका केली होती.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावं म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असं वाटेल आणि पंतप्रधान आल्यावर मुख्यमंत्रीही फिरतील, असं संदीप देशपांडे म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या- 

राज ठाकरेंचा मराठी कलाकारांशी ऑनलाईन संवाद; समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं दिलं आश्वासन

“मी भगवान विष्णूचा दहावा अवतार, ऑफिसला येऊ शकत नाही”; पाहा व्हिडीओ

“पृथ्वीवरचं तुझं काम संपलंय, तू आता परत ये”, मंदिरात साधूची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये म्हणाले…

सलग सातव्या दिवशी देशातील बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी वाढली

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या आईचं कोरोनाने निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More