बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाही, सगळंच रामभरोसे”

मुंबई | कोरोनामुळे सध्या संपूर्ण देशाची परिस्थिती बिकट बनत चालली आहे. वाढत्या रूग्ण संख्येमुळे दिवसेंदिवस आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून राज्य सरकार व केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “लसीकरण आहे पण लस नाही, खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही.” अशा आशयाचं ट्विट करून संदीप देशपांडे यांनी केंद्र व राज्य सरकारवर खरमरीत टीका केली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये होत असलेला वाद आणि यावरून होत असलेली नागरिकांची हेळसांड यावरून काही दिवसांपूर्वीच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘भिक नको पण कुत्र आवर’ या म्हणीला आता ‘लस नको पण भांडण आवर’ असं म्हणावसं वाटतंय आणि यांच्या ब्लेम गेममध्ये जनतेचा गेम होतोय, असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं होतं.

दरम्यान, मनसेने केलेल्या या खरमरीत टीकेनंतर शिवसेना याला कसं उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे फक्त गाण्यातच म्हणायचं की, तशी धमक महाराष्ट्र सरकार करून दाखवणार?’, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला. त्यामुळे मनसे विरुद्ध शिवसेना असा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.

थोडक्यात बातम्या –

धक्कादायक! कोरोनाबाधित वृद्ध जोडप्याची ‘या’ कारणामूळे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

विवाहीत प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात, गावकऱ्यांनी दोघांना विजेच्या खांबाला बांधलं अन्…

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी 27 वर्षांच्या संसारानंतर घेतला पत्नीशी घटस्फोट

खुशखबर! सर्वांची कोरोना संकटातून अखेर सुटका होणार; ‘या’ संशोधनाचा निष्कर्ष आला समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More