बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वडील टेम्पोवर ड्रायव्हिंग करत होते, त्यांना तिथंच कळालं आपला मुलगा तहसीलदार झाला!

सांगली | वडील टेम्पोवर ड्रायव्हर, आईही जास्त शिकलेली नाही, मात्र त्यांनी आपल्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं आणि त्याच्या पंखात बळ दिलं. मुलानंही आपल्या आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला आणि नायब तहसीलदारनंतर थेट तहसीलदार झाला.

ही संघर्षगाथा आहे सांगलीच्या मिरज तालुक्यातील एरंडोली गावच्या राकेश अण्णासाहेब गिड्डे यांची… नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात राकेश यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे.

राकेश यांनी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधून IT मध्ये पदवी मिळवली. २०१७ साली पदवीच्या शेवटच्या वर्षालाच त्यांनी नायब तहसीलदार होण्याची किमया केली. सध्या ते नांदेड इथं कार्यरत आहेत.

गरीबीचा कधीही बाऊ करायचा नसतो, तर तिच्यापासून संघर्ष करण्याची प्रेरणा घ्यायची असते. आज जे काही मला मिळालंय ते आई-वडील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे, असं राकेश सांगतात. भविष्यात शेतकरी आणि कामगार वर्गासाठी काम करणार असल्याचं त्यांनी ‘थोडक्यात’शी बोलताना सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

बाबा, तुम्ही सोबत असल्यावर माझ्या अंगात हत्तीचं बळ येतं; खडसेंच्या लेकीची भावूक पोस्ट

दिलासादायक! देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं

महत्वाच्या बातम्या-

ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम, गुजरात हायकोर्टाचा सरकारला हा सवाल

पिंपरी-चिंचवडमधल्या PSI ला तब्बल इतक्या लाखांची लाच घेताना अटक!

…म्हणून सोनाक्षीने ट्विटरला रामराम ठोकत लिहिली ही पोस्ट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More