मुंबई | कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर माध्यमांशी बोलताना राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. कायद्याने काय व्हायचं ते होईलचं पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी ठाकरे आहेत. हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबई, महाराष्ट्रात जे आमचे कानडी बांधव राहतात, आम्ही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्या आहे. इथं कानडी शाळा आम्ही चालवतो. आम्ही कानडी शाळांना अनुदान देत असल्याचं राऊत म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा मुंबईत, महाराष्ट्रात यावं आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी. इथं ते उद्योग क्षेत्र, हॉटेल क्षेत्रात जे कामं करतात, हे सर्वजण आमचेच आहेत. उद्या त्यांच जर मतदान घेतलं इथं, तर ते देखील सांगतील की बेळगाव महाराष्ट्रातचं आलं पाहिजे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
सेक्स करताना अतिउत्साह पडला महागात, तरूणाला गमवावा लागला आपला जीव
“धवलसिंह यांनी ज्याप्रमाणे बिबट्याची शिकार केली त्याचप्रकारे ते भाजपची शिकार करतील”
व्वा लय भारी! अर्धवट जळालेल्या बिडीच्या थोटक्यावरून पोलिसांनी लावला चोरीचा छडा
चावटपणा करणाऱ्याची फक्त चौकशीच नाही तर त्याला आत टाका- गुलाबराव पाटील