बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मांसाहार करा म्हणणाऱ्या संजय गायकवाडांनी रुग्णांना चिकन बिर्याणी आणि उकडलेली अंडी वाटली!

बुलडाणा | रोग प्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मांसाहार सेवन करावा, असं बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले होते. आता संजय गायकवाड यांनी कोव्हिड रुग्णांना चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे वाटप केल्याने संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आले आहेत.

संजय गायकवाड यांनी आज स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चिकन-बिर्याणी तसेच उकडलेल्या बॉईल अंड्यांच्या आहाराचं वाटप केलं. तसेच यावेळी रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मांसाहार करण्याचा डायट प्लॅन असल्याचं संजय गायकवाड यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

संजय गायकवाड यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांत्या प्रती दिलगिरी व्यक्त केली. ज्यांची मन दुखावली अशा व्यक्तींची दिलगिरी केली आहे. मात्र, ज्यांनी या विषयाचं राजकारण केलं त्यांची माफी मागणार नाही, असं संजय गायकवाड म्हणाले.

दरम्यान, कोरोनाकाळात मंदिरंही बंद आहेत. देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. स्वत:ची काळजी स्वत:लाच घ्यायची आहे. त्यामुळे उपास तापास बंद करा, रोज 4 अंडे खा. एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त भरपूर खा, असा सल्ला संजय गायकवाड यांनी लोकांना दिला होता.

थोडक्यात बातम्या- 

सावधान! चक्रीवादळामुळे ‘या’ चार जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जाहीर

‘मतदारसंघातील कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना 50 हजार रुपये देणार’; ‘या’ नेत्याची घोषणा

कसा पसरतो ब्लॅक फंगस?, बचावासाठी काय कराल?, महत्त्वाची माहिती आली समोर

काँग्रेसच्या युवा नेत्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी, पाहाल तर हैराण व्हाल

‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणून…’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा फडणवीसांवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More