बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत ते फडणवीसांनी दिलं, तेही आघाडीला टिकवता आलं नाही”

पुणे | मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात वातावरण पेटण्याची शक्यता दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्य टीका होत आहे. अशातच नुकतेच भाजपच्या प्रदेश उपध्याक्षपदी नियुक्ती झालेले संजय काकडे यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणाची मागणी 1985 पासून केली जात आहे. तेव्हापासून आजवर झालेल्या मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याची धमक दाखवली नाही. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि 50 वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले शरद पवारही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची हिम्मत दाखवली ते सुद्धा या सरकारला टिकवता आलं नसल्याचं संजय काकडे म्हणाले.

मुख्यमंत्री मुंबईचे आणि उपमुख्यमंत्री पुण्याचे तरीही याच दोन शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव का वाढला?, हे नेते फक्त सभागृहात बसून बैठका घेतात. दवाखाने, संस्था यांना भेटी देऊन मदत केली पाहिजे. अद्यापही तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी नाही. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांमध्ये ताळमेळ नसल्याचं म्हणत काकडेंनी उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर टीका केली.

दरम्यान, शरद पवार यांची 50 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. तीन वेळा ते मुख्यमंत्री झाले. मराठा नेते म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून ते उदयास आले. मराठ्यांसाठी काहीतरी करतील अशी समाजाला आशा होती. पण त्यांनाही आरक्षण देता आले नाही. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात राष्ट्रवादी आहे कुठे असा सवालही काकडेंनी केला.

थोडक्यात बातम्या- 

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात नरेंद्र मोदींना भेटू- अजित पवार

“मराठा समाजाने आता आंदोलन नाही, लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा”

कोरोनाबाधितांसाठी विरुष्काचा मदतीचा हात; ‘इतक्या’ कोटींची केली मदत

संकटं आल्यामुळेच मी घडले- सिंधूताई सपकाळ

‘मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच मन की बातची टेप लावली’; मुख्यमंत्र्यांची मोदींवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More