बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राऊत कोणाच्या सांगण्यावरून भाजपवर टीका करतात, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो”

पुणे | शिवसेनेचे नेेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी हे लक्षात घ्यावं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा भाजपच्या सर्वोच्च नेत्यांबाबत कधी टोकाचे बोलत नाहीत. अगदी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोनवर बोलले. उत्तम बोलणं झाले. आणि खुद्द मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितलं की, पंतप्रधान मदत करत आहेत आणि आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत असा लेख लिहितात, असं संजय काकडे म्हणाले.

संजय राऊत कुणाच्या सांगण्यावरून भाजपच्या नेत्यांवर टीका करून भाजपचे वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दरी वाढवण्याचं काम करीत आहेत? खरं तर, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो त्यांनी विनाकारण संपूर्ण माहिती न घेता, अभ्यास न करता, अज्ञानातून भाजपच्या नेत्यांबाबत लिखाण करू नये, अशा तिखट शब्दात काकडेंनी राऊतांवर निशाणा साधला.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला काय मिळालं?, एक मुख्यमंत्रिपद आणि नगरविकास खातं. परंतु सत्ता एकवटली आहे ती राष्ट्रवादी-काँग्रेसच्या हातात, असा टोलाही काकडेंना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोना काळात राजकारण करू नका, पक्ष विसरून मदत करा’; गडकरींनी टोचले भाजप कार्यकर्त्यांचे कान

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचा लॉकडाऊन आणखी वाढवला

मालदीवमध्ये दारु पिऊन वॅार्नर आणि स्टेलर यांच्यात जोरदार हाणामारी?, स्टेलरनं दिलं स्पष्टीकरण

“मदतीची विमानेच्या विमाने येत आहेत, ती नेमकी कुठे जात आहेत याचा खुलासा केंद्राने करावा”

“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More