बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बहिरा स्वतःच्या तालावर नाचे’; संजय निरूपम यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी परप्रांतीय लोकांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय निरूपम यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या राज ठाकरेंच्या बातमीचा फोटो शेअर केला. त्याला त्यांनी बिहारी भाषेत मथळा दिला आहे. ‘बहिरा नाचे आपन ताल’ म्हणजे ‘बहिरा आपल्याच तालावर नाचत असतो’, असा टोला संजय निरूपम यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने राज्यात नेहमी बाहेरून लोक येतात. बाहेरील राज्यात चाचण्या होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना जास्त दिसत आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांनी येताना कोरोना चाचणी न केल्याने राज्यात कोरोना वाढत आहे, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. बाहेरून येणाऱ्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची येण्याआधी चाचणी देखील करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी आधी सर्वपक्षीय बैठकीत केली होती.

दरम्यान, यावरून राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला. माझ्या सूचनेकडे लक्ष दिलं गेलं नाही. हे जर केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असली असती, असं राज ठाकरे म्हणाले.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या–

हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते पण…- दिया मिर्झा

‘या’ शहरात दिसलं काळजात धडकी भरवणारं चित्र; एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

“…म्हणून मुंबई इंडियन्सने पुन्हा यावर्षीही आयपीएल जिंकावी”

सचिन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये आहे ‘हे’ मोठं साम्य; ऑस्टेलियाच्या ‘या’ माजी खेळाडूचा मोठा दावा

शरद पवारांनी घरीच घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More