महाराष्ट्र मुंबई

‘काँग्रेसला संपवण्याचा हा एक मोठा कट आहे’; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा रंगली होती. यावर प्रतिक्रिया देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी धक्कादायक आरोप केला आहे.

संजय निरुपम यांनी काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय निरुपम यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहिम सुरु असून शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे, असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.

याच मोहिमेअंतर्गत 23 स्वाक्षऱ्या असणारी चिठ्टी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे, असंही निरूपम यांनी म्हटलंय.

 

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांचे आंदोलन भाजपच्या अंगलट, हरियाणातील खट्टर सरकार संकटात

शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाल्यास; संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले…

बिबट्याच्या शोधासाठी रोहित पवारांचा पुढाकार; बॅटरी आणि काठी घेऊन केली पाहणी!

#Video- हार्दिक पांड्या म्हणतो; ….तर मुंबईत मराठीतच बोललं पाहिजे!

नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आजी आणि लहान भावाची निर्घृण हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या