बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपनं अतिशय घाणेरडं राजकारण केलं, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी- संजय राठोड

मुंबई | परळी वैजनाथ येथील रहिवासी असणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी येथे आत्महत्या केली होती. त्य़ानंतर दिवसेंदिवस या प्रकरणात नवनवीन माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे भाजपने वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केल्यानंतर आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्येबाबत दु:ख व्यक्त केलं. भाजप खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे. सोबतचं, पूजा चव्हाण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी संजय राठोड यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंची भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, अनिल परबही उपस्थित होते. अशात आता संजय राठोडांनी राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे एक विनंती केल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, राजीनामा देतो पण चौकशी झाल्यावर तो मंजूर करा, अशी विनवणी संजय राठोड उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

थोडक्यात बातम्या-

राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, म्हणाले….

…मग आता संजय राठोड यांना अटक करा- अतुल भातखळकर

संजय राठोडांना आणखी एक मोठा धक्का, पूजाच्या कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती तक्रार करण्यास आली पुढे!

सर्वात मोठी बातमी, अखेर संजय राठोडांनी राजीनामा दिला

पूजा चव्हाण प्रकरणी भाजपकडून नीलम गोऱ्हे टार्गेट; ताई लवकर या आणि भूमिका घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More