बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजीनामा देतो, फक्त… संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ एक विनवणी

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचा हात असल्याचे पुरावे पूजा चव्हाणच्या लॅपटॉप मधून मिळाले. त्यामुळे संजय राठोडांचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा यासाठी भाजपकडून सरकारवर दबाव टाकला जात होता. यानंतर राठोड यांनी आज सपत्निक मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

उद्धव ठाकरेंची भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, अनिल परबही उपस्थित होते. अशात आता संजय राठोडांनी राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे एक विनंती केल्याचं समोर येत आहे.

राजीनामा देतो पण चौकशी झाल्यावर तो मंजूर करा, अशी विनवणी संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केल्याची माहिती आहे.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.  या बैठकीनंतर आज संध्याकाळी मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका, नाहीतर… पोहरादेवीच्या महंतांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा

पुण्यात शाळा, महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत बंद; वाचा महापालिका आयुक्तांचा नवा आदेश

राठोडांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही राजीनामा देणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

संजय राठोडांची विकेट पडल्यानंतर वनमंत्रिपद कुणाला?, ‘या’ नावांची जोरदार चर्चा

…म्हणून इमरान हाश्मीने दिला आलिया भट्टसोबत काम करण्यास नकार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More