Top News महाराष्ट्र मुंबई

कोरोना भारतात कुणी आणला?, संजय राऊतांनी सांगितलं ‘त्या’ व्यक्तीचं नाव

मुंबई |  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात कोरोना व्हायरस आणला, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी हा दावा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने लाखोंचा जलसा अहमदाबाद येथे झाला. या कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोना पसरला, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

अमेरिकेतून ट्रम्प यांच्याबरोबर आलेले काही ‘डेलिगेट्स’ मुंबई तसेच दिल्लीतही वावरले आणि संक्रमण झपाट्याने पसरले, ते नाकारता येणार नाही. संक्रमण वाढणे ही चिंता आहे. ही चिंता राष्ट्रव्यापी असायला हवी. महाराष्ट्रात संक्रमण वाढले म्हणून राष्ट्रपती शासन लावा सांगणारे या काळातही राजकारण करतात, हे धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय.

राजभवनात विरोधी पक्षाचे लोक जातात आणि राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करतात. कोरोनाचे संकट हाच जर राष्ट्रपती राजवट लावण्याचा निकष ठरला तर उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशसह किमान 17 राज्यांत सगळ्यात आधी राष्ट्रपती राजवट लावावी लागेल, असं म्हणत राऊतांनी विरोधी पक्षाचा समाचार घेतला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

3 टप्प्यात खुले होणार व्यवहार; कोणत्या टप्प्यात काय आणि कधी सुरु होणार? वाचा…

केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनूसार काय बंद राहणार, काय उघडणार?

 महत्वाच्या बातम्या-

वाढदिवसानिमित्त रूपाली चाकणकरांचं कार्यकर्त्यांना विशेष आवाहन

सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!

जैन समाजाच्या चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर साधु-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या