“आता भाजपने नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत”
मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळत चालल्याचं दिसत आहे.
समर्थ रामदास यांच्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना कुणी विचारलं असतं?, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं. याप्रकरणी वाद चिघळत चालेला असताना आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या वादात उडी घेतली आहे.
भाजपने नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत. त्या संदर्भात भाजपनेच आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. राऊत पुढे म्हणाले की, असं विधान दुसरं कुणी केलं असतं तर भाजपच्या लोकांनी आतापर्यंत रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला असता.
दरम्यान, त्यांच्याच राज्यपालांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावर भाजपनं ताबडतोब भूमिका घेणं महत्त्वाचं आहे, असंही राऊत म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
“राज्यपालांनी शिवप्रेमी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, त्वरीत वक्तव्य मागे घ्या”
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
मोठी बातमी! संभाजीराजेंची प्रकृती ढासळली, तरीही औषधं घ्यायला नकार
थायरॉईड असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘हे’ ज्यूस ठरतील फायदेशीर
“माझ्या प्रकृतीसाठी आणि समाजासाठी हे उपोषण थांबणं गरजेचं”
Comments are closed.