महाराष्ट्र मुंबई

“डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य”

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावलेली आहे. यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

‘ईडी’ वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडलं पाहिजे. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

‘ईडी’ची नोटीस वगैरे आली की, चौकशीसाठी संबंधिताने जायलाच हवे. नव्हे, कायद्याचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी समान. दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात तेदेखील बरोबरच आहे, कर नाही त्यास डर कशाला? हे त्यांचे सांगणे अगदी बरोबर आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपविरोधकांनाच का येत आहेत, हा प्रश्न राऊतांनी अग्रलेखातून उपस्थित केलाय.

ईडी वगैरे काय ते भाजपवाल्यांनी शिकवण्याची गरज नाही. शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत. खडसे, सरनाईक असतील नाहीतर महाविकास आघाडीतील इतर कोणी, त्यांच्यावरील कारवाया म्हणजे विकृतीचा कळस आहे, अशी टीका राऊतांनी केलीये.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही?- चित्रा वाघ

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, इतके नगरसेवक हाती शिवबंधन बांधणार

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पुन्हा धाडले समन्स

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे; उर्मिला मातोंडकरांचा कंगणाला अप्रत्यक्ष टोला

अभ्यासावरून पालक ओरडल्याने 14 वर्षांच्या मुलाने घर सोडलं; घरातून चोरले दीड लाख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या