Top News महाराष्ट्र मुंबई

डोमकावळ्यांची फडफड औटघटकेची ठरेल; संजय राऊतांची अग्रलेखातून सडकून टीका

मुंबई | ठाकरे सरकार कोरोनाविरोधातील लढाई लढण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका करत महाराष्ट्र भाजपने आज सरकारविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ या आंदोलनाच्या निमित्ताने भाजप ठाकरे सरकारविरोधात आज राज्यभर निदर्शने करणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याच आंदोलनाचा आजच्या सामनाच्या अग्रलेखातून यथेच्छ समाचार घेतला आहे.

भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ म्हणजे नेमके काय? ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा, असे सांगण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपच्या आंदोलनाचा समाचार घेतला आहे.

सारा देश कोरोनाविरुद्ध लढ्यात झोकून देऊन काम करीत असताना महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला फालतू आंदोलनाचे डोहाळे लागले आहेत. ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ अशा प्रकारचे बारसे या आंदोलनाचे झाले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून या मंडळींना महाराष्ट्र वाचवायचा आहे. मात्र हे आंदोलन त्यांच्याच नेत्यांच्या विरोधात ठरेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असंही राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या डोक्यावर ताणतणावामुळे परिणाम झाला आहे. जनतेने त्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिले आहे व भाजपवाले काही करू किंवा बोलू लागले तर लोक त्यांना हसून विचारत आहेत की, ‘मेरे, आंगने में तुम्हारा क्या काम है?’ या सगळय़ाचे वैफल्य येणे साहजिकच आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली देखील उडवली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

विधानपरिषदेत अमोल मिटकरी त्यांच्या कामाचा ठसा उमटवतील- प्रवीण गायकवाड

पाहा, आज पुण्यात किती रूग्ण वाढले अन् किती रूग्णांना डिस्चार्ज मिळाला…

महत्वाच्या बातम्या-

मुंबईतील कोरोनाची स्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र- देवेंद्र फडणवीस

आधी आपल्या बुडाखाली काय शिजतंय ते चंद्रकांत पाटलांनी पहावं- सतेज पाटील

‘गुंडगिरी प्रवृत्तीची लोक राजकारणात येतात तेव्हा…’; प्रकाश आंबेडकरांची निलेश राणेंवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या